विजेच्या समस्येकडे सुरेश भोगटेंनी वेधलं लक्ष !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 08, 2024 11:08 AM
views 67  views

सावंतवाडी : शहरातील महावितरण विभाग यांच्याकडील लाईट प्रवाह अनेक वेळा चालू बंद होण्याचे प्रकार वाढले आहेत‌. याबाबत सहाय्यक अभियंता यांच्याशी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी चर्चा केली.

गेल्या पंधरा दिवसापासून लाईट जाण्याचे प्रकार वाढत आहेत. आज सकाळपासून अकरा वाजेपर्यंत चार वेळा विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी झाडांच्या फांद्या तारा ना लागत असल्याचे कारण पुढे करून महावितरण अधिकारी यांनी सांगितलं की, यापुढे असे प्रकार आम्ही टाळण्याचे प्रयत्न करू आणि विद्युत प्रवाह सुरळीतपणे ठेवू असे आश्वासन माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांना दिले.