राष्ट्रीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धेत कुडासे हायस्कूलच्या सुरज देसाईला रौप्यपदक...!

Edited by: संदीप देसाई
Published on: February 06, 2024 13:54 PM
views 89  views

दोडामार्ग : छत्तीसगढ येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय शालेय १४ वर्षाखालील मुले व मुली साॅफ्टबाॅल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघास रौप्यपदक तर मुलीच्या संघास कास्यपदक प्राप्त झाले मुलांच्या संघातून खेळताना सरस्वती विद्यामंदिर,कुडासे ता.दोडामार्ग प्रशालेचा विद्यार्थी सुरज बाबाजी देसाई याने उत्कृष्ट कामगिरी केली.

धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कल्पनाताई तोरसकर,कार्याध्यक्ष डाॅ.मिलिंद तोरसकर,सचिव संतोष सावंत,समन्वय समिती सचिव रश्मीताई तोरसकर,सह.सचिव नंदकुमार नाईक,कुडासे सरपंच पूजा बाळाजी देसाई,पालकशिक्षक संघाचे उपाध्यक्ष पूजा दत्तप्रसाद देसाई,समन्वय समिती सदस्य सतिश मोरजकर,शालेय समिती सदस्य रामदास मेस्री,उदय गवस,सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस,क्रीडाअधिकारी विजय शिंदे,सिंधुदुर्ग जिल्हा हौशी साॅफ्टबाॅल असो.चे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ,सचिव अजय शिंदे,प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका सायली परब, प्रभारी मुख्याध्यापक जे. बी. शेंडगे, एस. व्ही. देसाई, पी. बी. किल्लेदार, क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, कुडासे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सुरज देसाई चे अभिनंदन केले.