सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील : सुरेश दळवी

Edited by: विनायक गावस
Published on: October 27, 2023 12:02 PM
views 117  views

दोडामार्ग : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत दोडामार्ग तालुक्यात पार पडत आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नेते सुरेश दळवी यांनी मनोगत व्यक्त केले. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत. देशात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. भविष्यात त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, शरद पवार यांनी सुरू केलेल्या फलोत्पादन योजनेमुळे येथील शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. शरद पवार यांच्यामुळे शेतकरी कृषी संपन्न होऊ शकला. पुलोदच्या स्थापनेवेळी शरद पवार या ठिकाणी पहिल्यांदा आले होते. नंतरच्या काळातही त्यांनी दोडामार्ग तालुक्यात भेट दिली. धरणग्रस्तांच्या उपोषणावेळी ते आले होते. येथील लोकांच्या भावना ऐकून घेत त्यांनी तोडगा काढला होता. आज सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत. देशात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. भविष्यात त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

तर अर्चना घारे-परब या गेली पाच वर्षे राष्ट्रवादी पक्ष तळागाळात पोहचवत आहेत. त्यांना आमदार जाहीर करा, निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो. सिंधुदुर्गातून पहिली महिला आमदार विधानसभेत पाठवतो असं मत व्यक्त सुरेश दळवी यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी खा. सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते सुरेश दळवी, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, व्हिक्टर डॉंन्टस, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, निरीक्षक शेखर माने, नम्रता कुबल, रेवती राणे, प्रसाद रेगे, संदीप गवस, सावली पाटकर,प्रदीप चांदेलकर, महादेव देसाई, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, गौतम महाले, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते