राष्ट्रवादीच्या सावंतवाडी युवक शहर अध्यक्षपदी नईम मेमन

सुप्रिया सुळेंच्या हस्ते नियुक्तीपत्र
Edited by: विनायक गावस
Published on: October 27, 2023 11:00 AM
views 122  views

सावंतवाडी : येथील राष्ट्रवादीच्या युवक शहर अध्यक्षपदी नईम मेमन यांची नियुक्ती करण्यात आली. संसदरत्न खासदार तथा राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र आले. पक्षाची युवक संघटना मजबूत करण्यासाठी तुम्ही संघटनात्मक काम करा, अशा सूचना यावेळी सौ. सुळे यांनी त्यांना दिल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला नेत्या अर्चना घारे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवा टेमकर, हिदायतुल्ला खान, याकुब शेख, हंजला नाईक, आवेज खान, कृपेश राठोड, अरबाज मकानदार, नफीस शेख, सालीम नदाब, जेद बकर, अरबाज शेख, रेहान बेग, रोनक वाडीकर,अमित सावंत, सागर जोशी, हारून मेमन, बाबु मेमन, मतीन शेख, रजी बेग आदी उपस्थित होते