
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचे गोवा मोपा विमानतळावर आगमन झाले असून राष्ट्रवादीच्यावतीने त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे - परब, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत आले. सुप्रिया सुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून थोड्याच वेळात त्यांच बांदा येथे जंगी स्वागत केले जाणार आहे.