डीएड बेरोजगारांच्या आंदोलनाला केंद्रीय मंत्री नारायण राणे, निलेश राणे यांचा पाठिंबा

माजी खासदार निलेश राणे यांनी केली पाण्याची मदत
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 05, 2023 11:29 AM
views 309  views

सिंधुदुर्ग : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली चार दिवस डीएड बेरोजगार युवकांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा आहे, असे सांगत भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर  यांनी माजी खासदार निलेश राणे यांनी या आंदोलनाकरता पाठविलेली पाण्याची मदत सुपूर्द केली. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड बेरोजगार युवकांनी 27 मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना पाण्याची समस्या भासत होती. माजी खासदार निलेश राणे यांनी या सुशिक्षित बेरोजगारांच्या पाण्याची व्यवस्था केली. ही मदत आनंद शिरवलकर यांनी सुपूर्त केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे, व माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आपल्या समस्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याजवळ मांडल्या जातील, असे आश्वासन यावेळी आनंद शिरवलकर यांनी दिल.


 तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 2007-8 मध्ये  जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना त्यावेळी जसा न्याय दिला तसा न्याय आम्हालाही मिळवून द्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्या डीएड बेरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय फाले यांनी केली.