देवगड तालुका उबाठा सेनेच्या समन्वयकपदी सुनील तेली !

महिला संघटकपदी हर्षा ठाकूर
Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 27, 2024 08:50 AM
views 188  views

देवगड :  देवगड तालुका शिवसेना उबाठा पक्षाचा देवगड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर झाली असून यामध्ये उपजिल्हाप्रमुखपदी यदु ठाकुर (जि.प.विभाग फणसगाव, बापर्डे, पडेल, पुरळ) तर नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी (शिरगाव, किंजवडे, मिठबाव, देवगड शहर यांची या विभागासाठी) तर देवगड तालुकाप्रमुखपदी मिलिंद साटम (शिरगाव, किंजवडे, मिठबाव, देवगड शहर या विभागासाठी), तर जयेश नर यांची फणसगाव, बापर्डे, पडेल, पुरळ या विभागासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

देवगड तालुका समन्वयक पदी सुनील तेली यांची फणसगाव, बापर्डे, पडेल, पुरळ या विभागासाठी तर देवगड तालुका महिला संघटकपदी हर्षा ठाकूर यांची शिरगाव, किंजवडे, मिठबाव, देवगड शहर या विभागासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.