कोकण रेल्वेच्या ​​मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर

Edited by:
Published on: July 02, 2025 11:52 AM
views 382  views

रत्नागिरी : सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.  सुनील नारकर हे १९९७ पासून कोकण रेल्वे मध्ये कार्यरत आहेत. कोकण रेल्वे मधील त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी  अनेक महत्त्वाची आणि जबाबदारीची पदे भूषवली आहेत.

रत्नागिरी येथे प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक (आरटीएम) आणि मडगाव येथे वरिष्ठ प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक (सीनियर आरटीएम) या पदांच्या जबाबदाऱ्या यापूर्वी त्यांच्याकडे होत्या. बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक (उपाध्यक्ष सीसीएम) पदाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना व्यावसायिक आणि जनसंपर्क क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे.