SUMMER SPECIAL | ताकाबरोबर मातीचे ग्लास फ्री

वाढत्या गर्मीत ताक पिणाऱ्यांची वाढते आहे संख्या
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 04, 2023 13:08 PM
views 743  views

कणकवली : सध्या एप्रिल सुरू आहे आणि वाढत्या गर्मीचा देखील प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक जण सावली आणि गारव्याचा आसरा घेतो आहे.  तसेच थंड पाणी किंवा ताक पिण्याकडे भर देत आहे. कणकवलीमध्ये अरुण राणे यांनी आकर्षक अशी संकल्पना राबवली आहे. ताक पिल्यास मातीचे ग्लास फ्री अशा पद्धतीची संकल्पना राबवून प्रत्येक व्यक्तीला ताक पिण्याचे फायदे देखील ते सांगत आहेत. हे ताकाचे ग्लास फक्त 15 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ते हा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे बहुसंख्य नागरिक आता कोल्ड्रिंक्स पिण्याऐवजी ताक पिण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ही हटके संकल्पना सगळ्यांच्याच आकर्षित करून घेत आहे.