
दोडामार्ग : मुलांना त्यांच्या इयत्तेनुसार वाचन लेखन, पायाभूत गणितीय कौशल्ये मजबुत करणे, मुलांचा आत्मविश्वास व उत्साह वाढवून पुढिल इयत्तेसाठी पूर्वतयारी पूर्ण करणे तसेच मुलांच्या शिक्षणात गाव पातळी वरील युवक / युवती व पालकांचा सहभाग वाढविणे व त्यांच्या डिजिटल कौशल्याचा विकास करणे या हेतूने संपूर्ण महाराष्ट्रात FLN निपूण महाराष्ट्र अभियान अंतर्गत समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ आज बोडदे शाळेने केला आहे.
उन्हाळी सुट्टीत मुलांच्या वाडीवार अभ्यासगटांचे नियोजन केले आहे. या अभ्यास गटासाठी रोशनी तुळशीदास गवस, शितल सचिन गवस, साक्षी नाईक, सुषमा अरुण गवस यांची नेमणूक स्वयंसेवक म्हणून करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख सूर्यकांत नाईक व विषयतज्ज्ञ रघुनाथ सोनवलकर यांच्या मार्गदर्शना खाली उन्हाळी सुट्टीत हे अभ्यास वर्ग चालणार आहे.
या उदघाटन कार्यक्रमाला गौरी गवस, आशा गवस, शितल गवस, अशोक गवस, समीर गवस, विलास आईर, प्रमोद गवस, पूजा सुतार, ऋतुजा गवस, सुशांती पाटील, रसिका घाडी, रुपाली गवस व साक्षी नाईक, मंजुश्री सावंत, गोपाळ पाटील व मुख्याध्यापक महेश नाईक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.