झाटये काजूचे मालक सुधिर झाटये भाजपात !

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रवेश
Edited by: दिपेश परब
Published on: April 23, 2024 14:07 PM
views 253  views

वेंगुर्ले : कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत तुळस - वेंगुर्ला येथील प्रसिध्द काजूउद्योजक सुधीर झांटये यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला . पालकमंत्री रविंद्र चव्हाण व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी त्यांना भाजपा जिल्हा उद्योग आघाडी संयोजक पदी नियुक्त केले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक भाजपा मध्ये सामील करून घ्यावेत असे आवाहन केले. 

    तसेच उद्योग आघाडीच्या वतीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले .

   यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,  जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, वेंगुर्ला महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ आदी उपस्थित होते.