वेंगुर्ला रोटरी क्लबच्या वतीने सुधीर सारंग व निलेश पेडणेकर यांचा सत्कार

Edited by: दिपेश परब
Published on: July 21, 2024 14:06 PM
views 116  views

वेंगुर्ला : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या वतीने क्रिकेट या खेळामध्ये गेली अनेक वर्ष खेळाडूंना लेदरबाॅलचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण देणारे सुधीर सारंग आणि संगीत विद्यालयात गेली बरेच वर्ष संगीताचे धडे शिकविणारे निलेश पेडणेकर   यांचा त्यांच्या शिष्यवर्गाच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रोटरी अध्यक्ष योगेश नाईक यांच्या कडुन शाल,श्रीफळ, गुलाबपुष्प व रोटरी सन्मान चिन्ह देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी रो.ॲड..प्रथमेश नाईक,  रो. राजेश घाटवळ , ठाकुर कॅश्यु इंडस्ट्रीजचे मालक रो. दिपक ठाकुर व समर्थ क्रिकेट अकॅडमीचे खेळाडू आयुष होडावडेकर , ओम वाडेकर , पार्थ मालवणकर अनिश मालवणकर , पलाश वाडेकर , अन्वेश मांजरेकर, वीर नाईक , ऋत्विक शुक्ला हे सर्व उपस्थित होते.

समर्थ क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातुन वेंगुर्ल्यात लेदर क्रिकेटसाठी उत्तम दर्जाचे खेळाडु घडविण्याचे काम सुधीर सारंग करीत आहेत. त्याच्या या निरपेक्ष भावनेने करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या वतीने त्याचा सत्कार केला. त्याबद्दल त्यांनी रोटरी परिवारांचे आभार मानले.