सुधीर जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सुधीर जोशी परोपकारी व लोभसवाणे व्यक्तीमत्व म्हणून परिचित
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 24, 2022 13:05 PM
views 187  views

मुंबई - आपल्या गावच्या धार्मिक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते सुधीर पांडुरंग जोशी यांचे काल दिनांक २३ रोजी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तांबळडेग गावाचे रहिवासी होते. त्यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत, उत्तरवाडा विकास मंडळ मुंबई आणि गावच्या धार्मिक कार्यक्रम नेहमी पुढाकार घेऊन आपली  सामाजिक बांधिलकी जपली असल्याने हरहुन्नरी कार्यकर्ता अशी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे एक लढवय्या कार्यकर्ता भर दिवाळीच्या धामधूम सुरू असताना गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुधीर जोशी हे परोपकारी व लोभसवाणे व्यक्तीमत्व म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ , भावजय असा परिवार आहे. रात्री त्यांच्यावर मुलुंड पूर्व गव्हाणपाडा येथे हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.