
सावंतवाडी : केंद्रस्तरीय बाल कला-क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव सावंतवाडीत होळीचा खुंट इथं आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते मैदानी खेळांचा शुभारंभ करण्यात आला.
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी यात सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात उत्स्फूर्त सहभाग घेतला. कबड्डी, खो-खो, गोळा फेक आदी मैदानी खेळांचा लाभ यामुळे विद्यार्थ्यांना घेता आला. यावेळी उद्घाटन प्रसंगी माजी क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर म्हणाले, शालेय अभ्यासासोबत सहशालेय उपक्रमात मुलांनी सहभाग घेण आवश्यक आहे. क्रीडा प्रकारांमुळे आपलं आरोग्य सुदृढ व निरोगी राहत. मुलांमधून चांगले खेळाडू निर्माण होऊन उत्कृष्ट क्रीडापटू जिल्ह्याला प्राप्त होतात. शाळा, कुटुंबास नावलौकिक प्राप्त होत अस मार्गदर्शन त्यांनी केलं.
यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी प्रशांत चव्हाण, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, दिलीप भालेकर केंद्रप्रमुख, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी पालक उपस्थित होते.