LIVE UPDATES

ज्‍येष्‍ठाचा आकस्‍मिक मृत्‍यू

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: May 21, 2026 20:04 PM
views 27  views

कणकवली : अत्‍यवस्‍थ झाल्‍याने कणकवली उपजिल्‍हा रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आलेल्‍या सत्‍यवान धोंडू बिर्जे (६५, रा. माईण) यांचा उपचारापूर्वीच मृत्‍यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी १२.४५ वा. सुमारास घडली. मृत्‍यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याबाबत मयत यांचा भाचा तथा कणकवलीचे नगरसेवक लुकेश कांबळे यांच्‍या खबरीनुसार कणकवली पोलीस ठाण्‍यात आकस्‍मिक मृत्‍यू म्‍हणून नोंद करण्‍यात आली आहे.