
दोडामार्ग : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्यान भाजप पक्षाने आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवार उभे केले हे खरं म्हणजे महायुतीला गालबोट लागलेला आहे. असंच असेल तर यापुढे युती होणार नाही असं ठामपणे शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी सांगितलं आहे.
दोडामार्ग जि.प व पं. स निवडणुकीत निवडणुन आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्य यांचे अभिनंदन करण्यासाठी येथील शिवसेना कार्यालयात आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, विधानसभा संपर्क प्रमुख प्रेमानंद देसाई, नवनिर्वाचित जि.प सदस्य साक्षी तळवडेकर, पं स सदस्य स्नेहा गवस, सायली निंबाळकर, उपतालुका प्रमुख दादा देसाई, गोपाळ गवस, युवा सेना तालुका प्रमुख भगवान गवस, बबलू पांगम, विलास सावंत, रामदास मेस्त्री, अनिल शेटकर, सूर्यकांत गवस, बळीराम शेट्ये, गुरु सावंत, अमर राणे, राकेश धर्णे, विशांत तळवडेकर, महिला पूजा देसाई, विशाखा नाईक, वंदना सावंत, सेजल गवस, उमा देसाई, गुणवंती गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी परब बोलताना म्हणाले की, संपूर्ण जिल्ह्यात भाजप पक्षाने आमच्या शिवसेनाच्या व महायुतीच्या उमेदवारा विरोधात अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले. हे खरतर चुकीचं आहे. अदृश्य शक्ती जी होती ही भाजपाचीच माणसे आहेत त्यामुळे असाच प्रकार येणाऱ्या काळात घडला तर यापुढे युती होणार नाही असं स्पष्ट मत परब यांनी व्यक्त केले.
मला फक्त नाव सांगा, ऑन दपोस्ट निलंबित करतो
शिवसेना पक्षातील काही पदाधिकारी कार्यकर्ते हे आपल्या उमेदवाराच्या विरोधात कालच्या निवडणीकत काम करत होते अस मला आताच समजलं मला फक्त त्याच नाव सांगा ऑन द स्पॉट त्याला आपल्या शिवसेना पक्षातून काढून टाकतो हा माझा शब्द आहे.
अदृश्य शक्ती भाजपचीच...
संपूर्ण जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारासमोर भाजपच्या काही अदृश्य शक्तीने अपक्ष उमेदवार उभे केले आणि त्याच ठिकाणी युतीला गालबोट लागले. ही अदृश्य शक्ती भाजपचीच आहे. त्यामुळे आम्हाला सर्व काही कळून चुकले त्यामुळे यापुढे असच चालू राहील तर आम्ही स्वतंत्र लढण्यास सक्षम आहोत.
शिवसेनेच्या ताकदीमुळे माटणेत विजय... गणेश प्रसाद गवस
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच उमेदवारांचे, विशेष करून माटणे जि.प व पं. स उमेदवारांचे एकदिलाने आणि ताकतीने काम आमच्या शिवसेनेने केले आहे. म्हणून याठीकाणी हा मोठा विजय झाला आहे. खर म्हणजे माटणे मतदार संघात युतीचे उमेदवार दीपक गवस व दुरुस्या उमेदवारा विरोधात भाजपनेच विरोधी उमेदवार उभे केले होते. आणि या विरोधी उमेदवारांना भाजप पक्षाचेच काहीजण मदत करत होते. हे आम्हाला सर्व समजलं होत त्यासाठी आम्ही शिवसेनेने एक मताने, एक दिलाने ताकत लावून काम केले त्यामुळे हा विजय झाला आहे.
बंडखोरांनापक्षात घेऊ नका..
महायुतीला गाल बोट लावून पक्षाविरोधात दोडामार्ग तालुक्यात मणेरीत एकनाथ नाडकर्णी, इकडे माटणेत राजेंद्र म्हापसेकर यांनी बंडखोरी केली अशीच बंडखोरी जिल्ह्यात झाली त्यामुळे असा गद्दारांना त्यांच्या पक्षाने पुन्हा पक्षात घेऊ नका असे आवाहन संजू परब यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना केले आहे.










