
वैभववाडी : तिरवडे तर्फ खारेपाटण येथील दिवेश दिपक कांबळे ( वय २० ) या महाविद्यालयीन तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी रात्री ९ वाजता राहत्या घरी त्याने गळफास लावून जीवन संपवले. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दिवेश हा तालुक्यातील एका महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई, वडील,बहीण, आजोबा असा परिवार आहे.