अंगणवाडी सेविकेचा असाही प्रामाणिकपणा...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 17, 2024 12:41 PM
views 459  views

देवगड : साळशी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी रात्री साळशी  येथील सुनिता नाईक यांच्या एका कानातील सोन्याची रिंग हरवली होती. दुस- या दिवशी अंगणवाडी सेविका अस्मिता मेस्त्री  नेहमीप्रमाणे शाळेत येत असताना त्यांना शाळेच्या प्रांगणात चमकणारी वस्तू दिसली.त्यांनी  निरखून पाहिले असता ती  सोन्याची रिंग असल्याचे समजले. .याबाबत त्यांनी चौकशी केली असता  हि रिंग सुनिता नाईक यांची  हरवलेली सोन्याची रिंग असल्याचे समजले. 

अस्मिता मेस्त्री यांनी खात्री करून हि सोन्याची  रिंग केंद्र मुख्याध्यापक गंगाधर कदम व सहाय्यक शिक्षक संतोष मराठे व अंगणवाडी  मदतनीस सविधा किंजवडेकर यांच्या समक्ष सुनिता नाईक यांना स्वाधीन केली. यावेळी सुनिता नाईक यांनी त्यांचे आभार मानले. हि सोन्याची रिंग दिड ग्राॅमची असून बाजारभावानुसार १५ हजार रुपये किमंतीची होती.असे सांगितले. अंगणवाडी सेविका  अस्मिता मेस्त्री हिच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.