अरिहंत हॉस्पिटलमध्ये 2 नवजात शिशुंवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया !

10 - 30 दिवसीय बालकांवर शस्त्रक्रिया
Edited by: देवयानी वरसकर
Published on: November 16, 2023 19:22 PM
views 49  views

केपे : मोठ्या माणसांची शस्त्रक्रिया म्हटले की भीती तर वाटतेच पण, लहान मुलांची शस्त्रक्रिया म्हटले की अंगावर शहारेच येतात. पण अरिहंत हॉस्पिटलमध्ये नुकताच 10 दिवसांच्या व 30 दिवसाच्या बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील 10 दिवसांच्या बालकावर इंटरप्टेड आयोर्टिक आर्च रिपेयर (टाईप-2) व इराकमधील 30 दिवसांच्या बालकावर कोअरकेशन आयोर्टिक रिपेअर व पीडीए लायगेशन ही शस्त्रक्रिया करण्यात आली. याद्वारे कोलमडून गेलेल्या पालकांना अरिहंत हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या रुपात भेटलेल्या देवदूतांनी धीर देऊन अवघ्या 10 दिवसांच्या व 30 दिवसाच्या नवजात बालकांवर शस्त्रक्रिया करण्याचा नाजूक निर्णय यशस्वीपणे अमलात आणला. सदर 10 दिवसांचे बाळ दक्षिण गोवा येथील केपे व अवघ्या 30 दिवसांचे बाळ इराकमधील बगदाद येथील रहिवासी आहे.

गोव्यातील 10 दिवसांचे बाळ

गोव्यातील बेबी ऑफ प्रियांका नामक नवजात मुलाला जन्मानंतर त्रास जाणवू लागला. यानंतर पालकांनी मुलाला गोवा येथील एका हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केले. त्यावेळी बाळाची प्रकृती खूपच हलाखीची असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तेथे मुलाच्या सर्व तपासण्या व चाचण्या केल्यानंतर सदर मुलाच्या हृदयाच्या महाधामानीला शरीराला रक्तपुरठा करण्यात अडथळा निर्माण होत होता.  त्यामुळे त्याचे हृदय कमकुवत झाले होते. त्याचबरोबर हृदयाला छिद्र असल्याचेही निष्पन्न झाले. शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्यानंतर पालकांना एकप्रकारे धक्काच बसला. यानंतर पालक स्वतःला सावरत व कुटुंबाला धीर देत मुलावर कोठे शस्त्रक्रिया करावी याचा विचार करत होते. त्यावेळी मुलांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्याचा प्रचंड अनुभव असणाऱ्या डॉ. एम. डी. दीक्षित यांच्याकडून

इंटरप्टेड आयोर्टिक आर्च रिपेयर (टाईप-2) शस्त्रक्रिया करून घेण्याचे ठरविले. यानंतर मंगळवार दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी व्हेंटिलेटर रुग्णवाहिकेतून अरिहंत हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यानंतर नवजात शिशुच्या सर्व तपासण्या व चाचण्या करण्यात आल्या व त्याचदिवशी दुपारी डॉ. एम. डी.  दीक्षित यांनी बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. यानंतर बालकाने उपचाराला उत्तम प्रतिसाद दिल्याने केवळ 10 दिवसातच म्हणजेच शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर रोजी बालकाला डिस्चार्ज देण्यात आला. 

इराकमधील 30 दिवसांचे बाळ

इराकमधील 30 दिवसांच्या आदम अब्बास अल झुआरी या नवजात शिशुला जन्मजात हृदयाला छिद्र व त्याला हृदयाच्या महाधामानीची समस्या होती. त्यामुळे इरामधील डॉक्टरांनी त्याच्या पालकांना सांगून शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. यावेळी त्यांना डॉ. एम. डी. दीक्षित याच्याबाबत प्रसिद्ध झालेल्या हृदय शस्त्रक्रियेबाबतचे काही आर्टिकल मिळाले व त्यांच्या मित्रपरिवाराने बाळावर डॉ. एम. डी. दीक्षित यांच्याकडून शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला. यानंतर पालकांनी डॉ. एम. डी. दीक्षित यांच्याशी संपर्क साधून 7 नोव्हेंबर रोजी बेंगळूर मार्गे बेळगाव येथे दाखल झाले. यावेळी आदमच्या सर्व तपासण्या व चाचण्या केल्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी सकाळी आदमवर कोअरकेशन आयोर्टिक रिपेयर व पीडीए लायगेशन ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आपल्या अवघ्या 30 दिवसांच्या पाल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला  डॉ. अभिषेक जोशी, डॉ.  प्रशांत एम. बी., डॉ. अविनाश लोंढे व सहकाऱ्यांनी या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. हॉस्पिटलचे चेअरमन सहकाररत्न रावसाहेब पाटील, संचालक अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून बालकांच्या प्रकृतीची विचारपूस करून शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांचे कौतुक केले. 

यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने समाधानी

आपल्या मुलाची शस्त्रक्रिया करण्याचा स्थानिक डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतर पालकांनी अरिहंत हॉस्पिटलशी संपर्क साधला. यानंतर आम्ही पालकांना त्वरित बाळांसह हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला. दोन्ही बालके दाखल झाल्यानंतर त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे समजले. त्यावेळी आम्ही लागलीच बालकांवर शस्त्रक्रिया केली.  यानंतर त्यांना 3 ते 4 दिवस अतिदक्षता विभागात ठेवून योग्य ती काळजी घेण्यात आली. विशेष म्हणजे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असूनही बालकांना 8 दिवसात डिस्चार्ज देण्यात आला. आता परराज्य व परदेशातील रुग्ण आमच्यावर विश्वास ठेवून उपचारासाठी येत आहेत. रुग्णांच्या या विश्वासास आम्ही पात्र ठरलो याचा आम्हाला अभिमान असून यासाठी हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया डॉ. एम. डी. दीक्षित यांनी दिली.

देवदूतच भेटले

आमच्या मुलावर शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्याने आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. यानंतर आपल्यालाही मोठा धक्काच बसला. पण आम्ही स्वतःला सावरत कुटुंबाला धीर देत नवजात बालकावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आम्ही डॉ. एम. डी. दीक्षित यांच्याकडून शस्त्रक्रिया करून घेण्याचे ठरवून बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. यानंतर डॉ. एम. डी. दीक्षित यांनी आमच्या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करून आम्हाला एकप्रकारे नवजीवनच प्रदान केले आहे. तसेच आम्हाला अरिहंत हॉस्पिटलमध्ये डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या रुपाने देवच भेटला, अशी प्रतिक्रिया बालकांच्या पालकांनी दिली.

अरिहंत हॉस्पिटल मेडिकल हब 

अरिहंत हॉस्पिटलची स्थापना होऊन नुकताच वर्षपूर्ती झाली आहे. पण या वर्षभराच्या कालावधीत देशासह विदेशातही हॉस्पिटलने नावलौकिक मिळविले आहे. याद्वारे अरिहंत हॉस्पिटल विदेशातील रुग्णांसाठी मेडिकल हब बनले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या अरिहंत हॉस्पिटलमध्ये अनेक विदेशी रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राष्ट्रीयसह आंतरराष्ट्रीयस्तरावरही अरिहंत हॉस्पिटलने कीर्ती मिळविली असून देश-विदेशातील रुग्णांसाठी मेडिकल हब बनले आहे.