नगरसेविका अक्षता जैतापकर यांच्या मागणीला यश | नगरपंचायतीत सभांना पत्रकारांना प्रवेश

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 27, 2023 11:21 AM
views 694  views

वैभववाडी : वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीत सभांना पत्रकारांना निमंत्रित करण्यात यावे या मागणीसाठी गेले दिड वर्ष झगडणाऱ्या नगरसेविका अक्षता जैतापकर यांच्या मागणीला यश आले. नगरपंचायतीकडून २७ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेला निमंत्रित करण्यात आले आहे.

वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीच्या विविध सभांना प्रसारमाध्यमांना निमंत्रित केले जात नव्हते.गेले दिड वर्ष नगरसेविका सौ.जैतापकर या विषयांसाठी झगडत होत्या.या विषयासंबंधी त्यांनी महीला दिनी उपोषण देखील छेडले होते.जिल्हाधिकारी यांच्याकडे या संदर्भात दाद मागितली होती.अखेर त्यांच्या या मागणीला यश आले आहे.

दिड वर्षांनंतर नगरपंचायतीच्यावतीने पहील्यांदाच प्रसारमाध्यमांना सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण दिले आहे.सभागृहात विरोधक जे विषय मांडतात तसेच सत्ताधाऱ्यांचा कारभार कशाप्रकारे सुरू आहे ते जनतेपर्यंत पोहचणे गरजेचे होते.याकरिता या सभांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आवश्यक होती.त्याकरिता आपण ही मागणी लावून धरली होती.जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून या विषयाला न्याय मिळाला असं सौ.जैतापकर यांनी सांगितले.