मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

Edited by:
Published on: February 18, 2025 12:47 PM
views 534  views

भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. नामदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, ही नौका आता लोकांसाठी खुली होणार आहे. यामुळे सिंधुदुर्गमधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. विजयदुर्ग बंदरासाठी विशेष प्रयत्न केला आहे.

विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून विजयदुर्गवासीयांनी नामदार नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला होता. समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  महाराष्ट्राचे बंदर व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेतली. त्यांनी या नौकेला विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. अखेर, त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही नौका विजयदुर्ग बंदरासाठी मिळवण्यात यश आले आहे.

पर्यटन वाढीस लागणार मोठा हातभार

ही नौका पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक विजयदुर्गला येणार आहेत. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. नौकेचे स्थलांतर कर्नाटक येथील बंदरातून करण्यात येणार असून, पर्यटन महामंडळाने त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच ही नौका विजयदुर्ग बंदरात दाखल होईल.

आईएनएस गुलदार: एक शक्तिशाली युद्धनौका

भारतीय नौदलाच्या लँडिंग शिप टँक (मध्यम) श्रेणीतील आईएनएस गुलजार हे जहाज, त्याच्या सामरिक क्षमतांमुळे, नौदलाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

महत्त्वाची वैशिष्ट्ये:

नौदलात समावेश: ३० डिसेंबर १९८५

विस्थापन: १,२०० टन

लांबी: ८१ मीटर

रुंदी (बीम): १० मीटर

सक्षम अधिकारी व कर्मचारी: ६ अधिकारी आणि ८५ खलाशी

वाहन क्षमता:

चिलखती कर्मचारी वाहक

रणगाडे (टँक)

स्वयं-चालित तोफा

ट्रक

१५० पेक्षा अधिक सैन्य

सामरिक सामर्थ्य आणि संरक्षण

आईएनएस गुलजार अत्याधुनिक ३० मिमी क्लोज-रेंज गन आणि रॉकेट लाँचर्सने सुसज्ज आहे. हे जहाज विविध नौदल मोहिमांमध्ये प्रभावीपणे सहभागी झाले आहे.