सागरी जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गनगरीतील जलतरणपटूंचे यश

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 22, 2025 16:43 PM
views 312  views

सिंधुदुर्गनगरी :  देवगड - विजयदुर्ग येथील खाडीत आयोजित करण्यात आलेल्या सागरी ओपन वॉटर जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी येथील स्वरा गावडे, लिनाशा नाईक,शिवांश खोत, सिद्धी चव्हाण या लहान जलातरण पट्टूनी दमदार कामगिरी करत मोठे यश मिळविले आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे 

सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलाव येथे सराव करणाऱ्या व पणदूर हायस्कुल येथील इयत्ता सहावी मधील स्वरा संदीप गावडे हिने 2 किलोमीटर जलतरण स्पर्धेत मुलींच्या गटात दुसरा क्रमांक तसेंच रानबाबुळी प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीतील सिद्धी प्रदीप चव्हाण हिने 1 किलोमीटर जलतरण स्पर्धेत मुलींच्या गटात  चौथा क्रमांक, 500 मिटर जलतरण स्पर्धेत जी.प.मुख्यालय शाळेत पहिलीतील  लिनाशा हितेश नाईक हिने मुलींच्या गटात तिसरा व पोतदार स्कुल मधील पहिलीतील  शिवांश शिवप्रसाद खोत यानेही 500 मिटर जलतरण स्पर्धेत मुलाच्या गटात तिसरा क्रमांक पटकावला आहे 

सिंधुदुर्गनगरी येथिल जलतरण तलाव येथे जलतरण प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांच्या मार्गदर्शनाखाली चारही यशस्वी जलतरणपटू प्रशिक्षण घेत असून त्यांनी लहान वयातच खाडी मध्ये पाहण्याचे धाडस दाखवून नंबरही पटकावला याबद्दल चारही मुलाचे विशेष कौतुक केले जात आहे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.

विजयदुर्ग येथील दुर्गामाता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने व कोल्हापूरच्या जिम स्विमींग अकॅडमी च्या आयोजना खाली व महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने ८ वी ओपन वॉटर जलतरण स्पर्धा घेण्यात आली.येथील ऐतिहासिक खाडी मध्ये विविध वयोगटासाठी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेत वय वर्षे 5 ते वय वर्षे 70 पर्यंतचे मुंबई, पुणे ,नाशिक, बेळगाव, कोल्हापूर, तेलंगना अशा विविध भागातून व राज्यातून 100 स्पर्धक सहभागी झाले होते.