नाट्यछटा स्पर्धेत बांदा केंद्र शाळेच्या सर्वज्ञ वराडकरचं सुयश...!

Edited by:
Published on: March 18, 2024 10:11 AM
views 172  views

बांदा : नाट्यछटा कला अकादमी पुणे आयोजित दिवाकर स्मृती ऑनलाईन नाट्यछटा स्पर्धेत बांदा नं. १ केंद्रशाळेचा विद्यार्थी सर्वज्ञ सुर्यकांत वराडकर याने गट क्रमांक ३ मध्ये जागतिक पातळीवर तृतीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. दरवर्षी नाट्यछटा कला अकादमी यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असुन यावर्षी हे ३२वे वर्षे असुन या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.

सर्वज्ञ वराडकर याने मी कोण होणार ही नाट्यछटा या स्पर्धेसाठी सादर होती.सर्वज्ञ वराडकर याने आतापर्यंत जिल्हा व राज्य पातळीवरील विविध स्पर्धेत सहभागी होऊन शंभरहून अधिक बक्षिसे मिळवली आहेत.सर्वज्ञने मिळवलेल्या या यशाबद्दल बांदा केंद्रशाळा मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये,बांदा सरपंच प्रियंका नाईक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांनी अभिनंदन केले आहे.

सर्वज्ञला वर्गशिक्षिका रसिका मालवणकर,स्नेहा घाडी, शुभेच्छा सावंत,शांताराम असनकर, रंगनाथ परब,जे.डी.पाटील, जागृती धुरी,मनिषा मोरे,सपना गायकवाड,रूपाली सावंत,स्नेहा कदम तसेच आई वडील यांचे मार्गदर्शन लाभले.सर्वज्ञने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.