
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील पुं. अं. कर्ले महाविद्यालयाच्या साक्षी शिद्रुकने महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत करिअर संसदेतील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धेत यश मिळवले असून बारामती येथील राज्यस्तरीय अधिवेशण साठी तिची निवड झाली आहे.
देवगड तालुक्यातील शिरगांव येथिल पुंडलिक अंबाजी कर्ले कला वाणिज्य महाविद्यालयाच्या साक्षी शिद्रुक या विद्यार्थ्यांनीने कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात ती कोकण विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
जिल्ह्यातील साधन संपत्ती रोजगाराच्या उपलब्ध संधी युवकांच्या समोरील आव्हाने भविष्यातील उपलब्ध विकासाच्या संधी या विषयवार करिअर कट्टा उपक्रमांतर्गत पॉवर पॉइंट पेझेंटेशन स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने २७ डिसेंबर रोजी जिल्हा स्तरावर पार पडली. तर २८ डिसेंबर रोजी मुंबई, नवीमुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याची ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा पार पडली या दोन्ही स्पर्धेत साक्षी शिद्रुक हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
करिअर संसदेतील पदाधिकाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन १२ व १३ जानेवारी २०२५ रोजी शारदानगर बारामती येथे होणार आहे. या अधिवेशनात राज्यातील प्रत्येक महाविद्यालयातील करिअर संसदेचे निवडक ७५० विद्यार्थी महाविघालयीन समन्वयक जिल्हा समन्वयक आणि प्राचार्य प्रवर्तक सहभागी होणार आहेत. या राज्यस्तरीय अधिवेशनात विभागस्तरावर प्रथम आलेल्या पीपीटी चे सादरीकरण होणार आहेत. साक्षी शिद्रुक हीला कोकण विभागाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे.
कोकण विभागस्तरावर महाविद्यालयाला मिळालेल्या या यशाबद्दल शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले, संस्था पदाधिकारी, सर्व संचालक, प्राचार्य समीर तारी, सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे. साक्षी शिद्रुक हिला यासाठी करिअर कट्टाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डॉ.अजित दिघे, महाविद्यालयाच्या करिअर कट्टा समन्वयक प्रा.अक्षता मोंडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.