
कणकवली : 22 नोव्हेंबर रोजी माध्यमिक विद्यामंदिर कनेडी (ता.कणकवली) येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या कु.सेजल सखाराम हुंबे या विद्यार्थिनीने 14 वयोगटाखाली द्वितीय तर 17 वयोगटाखालील स्पर्धेत कु राठोड गायत्री विजयकुमार या विद्यार्थिनीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. तर 14 वयोगटात गोविंद राजाराम बालेघाटकर या विद्यार्थ्याने चांगली कामगिरी केली. वरील दोन स्पर्धकांचे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून या विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक विजयकुमार राठोड यांचे मार्गदर्शन मिळाले सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था स्तरावर अभिनंदन होत आहे.
सदर विद्यार्थ्यांचा कोकण पदवीधर शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सुभाष सावंत, जेष्ठ संचालक संदेश पटेल, फोंडाघाट माजी संचालक गजानन नांनचे, सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब मांजरेकर, कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विष्णू फुलझेले एल एम सीचे सदस्य केदार रेवडेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक सावंत, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष जोईल तर उपस्थितांचे आभार प्रा.सतीश कामत यांनी मानले