मिलाग्रीसच्या विद्यार्थ्यांचं गणित प्राविण्य परीक्षेत यश

Edited by: विनायक गावस
Published on: January 11, 2024 09:53 AM
views 163  views

सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित प्राविण्य परीक्षेत यश मिळवले आहे. कृष्णा महेश पास्ते,अथर्व परशुराम सावंत, तनिष्का दीपक पंडित, तीर्था राकेश मौर्ये, सिद्धी हेमंत नाईक या सर्व विद्यार्थ्यांची निवड गणित प्रज्ञा परीक्षेसाठी झालेली आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड साल्डना यांनी अभिनंदन केले. फादरांच्या शुभहस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो, पर्यवेक्षिका मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.