मंडणगड : मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित, लालबहादूर शास्त्री हायस्कूल, दहागांव च्या ,विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विविध
स्पर्धेत सुयश मिळविले. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक मुख्याध्यापक संघ, तालुका मंडणगड आयोजित साने गुरुजी कथाकथन स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडणगड ,येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.तालुका स्तरीय साने गुरुजी कथाकथन, निबंध व चित्रकला स्पर्धेत लाल बहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव च्या विद्यार्थ्यांनी सूयश संपादन केले आहे.
निंबध स्पर्धा मोठा गट :
१) कुमारी सानिका सुनिल शिंदे प्रथम क्रमांक
२)मोठा गट चित्रकला स्पर्धा - कुमार ऋतिक रुपेश सोविलकर - द्वितीय क्रमांक
३)लहान गट वकृत्व स्पर्धा - कुमारी आर्या सागर तांबुटकर - द्वितीय क्रमांक. या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन मुख्याध्यापक विजय खाडे यांच्या
हस्ते गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
सर्व यशस्वी स्पर्धकांचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक, श्री. विजय खाडे यांनी अभिनंदन केले. असेच यश संपादन करण्याबाबत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांवर परिसरातून अभिनंदन असा वर्षाव होत आहे.