
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता आठवी मधील अद्विता संजय दळवी हिने द्वितीय क्रमांक प्राप्त करत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत स्थान मिळवले आहे.
वक्तृत्व स्पर्धेचा विषय हा 'कृत्रिम बुद्धिमत्ता, संभाव्यता व आव्हाने' असा होता. या स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये लेखी चाचणी, भाषण व प्रश्नोत्तर फेरी अशा स्वरूपात घेण्यात आली.अद्विता हिचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.