पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग वालावलकर यांचा पोलीस महासंचालकांकडून खास सन्मान

Edited by:
Published on: April 26, 2024 11:31 AM
views 155  views

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी व  प्रशंसनीय सेवेबद्दल मुंबई शहरामध्ये नियुक्ती असलेले पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग दिगंबर वालावलकर यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक जाहीर करण्यात आले आहे.  राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ही निवड जाहीर केली आहे. पांडुरंग वालावलकर हे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील साकेडी गावचे सुपुत्र असून गेली अनेक वर्ष त्यांनी पोलीस दलात सेवा बजावली आहे. गडचिरोली नक्षलग्रस्त भागासह, लोहमार्ग पोलीस यासह अन्य राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. पांडुरंग वालावलकर यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.