
मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विविध विभागाच्या वतीने नुकतेच अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘रसायनशास्त्र’ व ‘भौतिकशास्त्र’ विभागाने त्रिवेंद्रम,कोईम्बतूर, उटी, मंगलोर या परिसरामध्ये सहलीचे आयोजन केले होते. ‘भूगोल’ विभागाच्या वतीने केरळ, कन्याकुमारी, रामेश्वरम, उटी, म्हैसूर व मंगलोर या परिसरामध्ये तर ‘वाणिज्य’ व ‘अर्थशास्त्र’ विभागाच्या वतीने पुणे परिसर, कात्रज डेअरी, पाली, खोपोली, महड या परिसरात सहलीचे आयोजन केले होते. ‘वनस्पतीशास्त्र’ व ‘प्राणीशास्त्र’ विभागाच्या वतीने कोल्हापूर परिसरामध्ये शिवाजी विद्यापीठ, कणेरी मठ तसेच करवीर परिसर या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ‘इतिहास’ विभागाच्या वतीने भाजे लेणी व लोणावळा परिसरात अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या सहलीचा मनमुराद आंनद घेतला, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव व उपप्राचार्य डॉ.वाल्मिक परहर यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली या विविध विभागाच्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. भरतकुमार सोलापूरे, डॉ. महेश कुलकर्णी, प्रा. प्रितेश जोशी, डॉ. ज्योती पेठकर, प्रा. हनुमंत सुतार, डॉ.मुकेश कदम, प्रा. संदीप निर्वाण, प्रा. शरिफ काझी, डॉ. सुरज बुलाखे, डॉ. संगीता घाडगे, डॉ. विनोदकूमर चव्हाण व डॉ. शैलेश भैसारे हे सर्व सहभागी झाले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चार भिंतीच्या बाहेरचे जग, निसर्ग, गड, किल्ले कारखाने, सहकार क्षेत्र, शैक्षणिक संकूल अशा ठिकाणची माहिती विद्यार्थ्यांना जाणून घेण्याची आवड निर्माण व्हावी, अशा प्रकारच्या भेटीमधून त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने सदर अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी दिली.