
दोडामार्ग : विद्यार्थ्यांनो आज स्पर्धा परीक्षेचं युग आहे, यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा असा संदेश देत न्यू इंग्लिश स्कूल भेडशी प्रशालेमध्येच माझ्या उज्वल भविष्याचा पाया रचला गेला असे उद्गार सिडकोचे सल्लागार व माजी पोलीस अधिकारी मोहन गवस यांनी काढले.
ते न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज भेडशी व इंग्लिश मिडीयम स्कूल भेडशी प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समांभाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विवेकानंद नाईक, संजय उसपकर, साटेली भेडशी सरपंच श्रीम. छाया धर्णे, गुरुवर्य एन. टी. सावंत , समन्वय समिती सहसचिव तथा प्राचार्य नंदकुमार नाईक , समन्वय समिती तथा शालेय समिती सदस्य अनिल मोरजकर, सुभाष बोंद्रे, तुकाराम उर्फ भाऊ टोपले, पंढरीनाथ देऊलकर, माजी सरपंच नामदेव धर्णे, इंग्लिश मीडियम मुख्याध्यापिका श्रीम. निशिगंधा भणगे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष निश्चल परमेकर, सौ. नेहा मोरजकर, पत्रकार रत्नदीप गवस, गणपत डांगी, महादेव दळवी, श्री. पार्सेकर, शालेय मुख्यमंत्री कु. सज्जन दळवी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सहाय्यक शिक्षका सौ. देउलकर यांच्या मार्गदर्शनाने मुलांनी संगीत इशस्तवन स्वागतगीत सादर केलं. वार्षिक अहवाल वाचन माध्यमिक सौ. वेदा मणेरकर, क्रीडा अहवाल एच. आर. सावंत, इंग्लिश मीडियम अहवाल श्रीम. अश्विनी सावंत यांनी सादर केला. अहवालातून कला, क्रीडा, सांस्कृतिक यशाचा आढावा घेत संस्थेच्या भावी योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी वर्षभरातील विविध स्पर्धा, क्रीडास्पर्धा यामध्ये उल्लेखनीय यश मिळवले त्या आदर्श गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माजी विद्यार्थी गणपत डांगी, प्राचार्य श्री नंदकुमार नाईक यांना कोटा अकॅडमी व लायन्स क्लब गडहिंग्लज रॉयल मार्फत लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच धी बांदा नवभारत संस्थेचा गुरुवर्य व्ही. एन. नाबर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल मोहन गवस साहेब व मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. प्रशालेच्या मंडप उभारण्यासाठी मोहन गवस व संजय उसपकर यांनी 51 हजार रुपये देणगी जाहीर केली.
सूत्रसंचालन मधुरा नाईक व अमित कर्पे यांनी केले. आभार एच. आर. सावंतयांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, आजी माजी विद्यार्थी, शिक्षण प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.