चांदोशीत विद्यार्थी घेतायत 'व्यक्तिमत्त्व विकासा'चे धडे !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 23, 2024 09:11 AM
views 92  views

देवगड :  देवगड चांदोशी येथील श्री भवानी मंगल कार्यालय येथे नुकतेच ३ दिवसीय निवासी विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर संपन्न झाले. सेवा भारती कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प देवगड यांनी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले होते. या तीन दिवसीय निवासी शिबिरात देवगड तालुक्यातील १८ जि. प. शाळांतील ८८ मुली व ५६ मुलगे असे एकूण १४४ शिबिरार्थी पूर्णवेळ सहभागी झाले होते.

या शिबिरामध्ये विज्ञान व राष्ट्रभक्ती या विषयांवर ९ बौद्धिक सत्रे व ४ शारीरिक सत्रे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरात भारतमाता पूजनाचा विशेष लक्षवेधी कार्यक्रम पार पडला. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. श्री. किरण हिंदळेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शिबिरात आनंद राजम, शिबीर कार्यवाह, सुरेंद्र शर्मा, संघटन मंत्री, सेवा भारती कोकण प्रांत, आणि  हेमंत आईर प्रयोगशाळा विषय प्रमुख, सेवा भारती कोकण प्रांत हे पूर्णवेळ उपस्थित होते.

या शिबिराला  विलास तावडे, मा. अध्यक्ष, सेवा भारती कोकण प्रांत,  धनंजय जठार, शिक्षण आयाम प्रमुख, सेवा भारती कोकण प्रांत, महेश कानेटकर, कार्यवाह, रा.स्व.संघ, देवगड तालुका, ॲड. अजितगोगटे, माजी उपाध्यक्ष रा.स्व. संघ जनकल्याण समिती, कोकण संभाग यांनी भेट दिली. तसेच ४९ पालक, शिक्षक, हितचिंतक, देणगीदार यांनी सदिच्छा भेट दिली.ह्या  प्रयोगशाळा प्रकल्प मध्ये २७ माजी विद्यार्थी, प्रकल्प समिती सदस्य,जिल्हा समिती सदस्य आदींनी यावर मेहनत घेतली.