विद्यार्थ्यांनी गावाचं नाव उज्ज्वल करावं : सरपंच विलास नावळे | लोरे नं. २ इथं स्पोर्ट्स ग्रुपने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 11, 2023 20:09 PM
views 116  views

वैभववाडी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाखण्याजोगी आहे.विद्यार्थांनी आपल्या यशात सातत्य राखून गावच नाव उज्ज्वल करावं असं प्रतिपादन लोरे नं२ सरपंच विलास नावळे यांनी केले.

लोरे मांजलकरवाडी येथील स्पोर्ट्स ग्रुपच्या वतीने १० वीच्या  परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा  सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री नावळे बोलत होते.व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक नाना रावराणे, अनिल नरांम, देऊ मांजलकर ,  विनोद मोरे संतोष मोरे सुभाष कुडतरकर ,संजय सुतार, संतोष शिंदे, बाबू मेस्त्री ,केदार नवाळे,आर्यन मांजलकर ,भाऊ कदम, नारायण म्हाद्ये , चद्रकांत डोंगरे, किशोर घावरे आणि स्पोर्ट्स ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

नावळे म्हणाले, स्पोर्ट्स ग्रूपने उत्कृष्ट उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांचा पाठीवर कौतुकाची थाप देऊन हा गृप विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहे.विद्यार्थानी यातून प्रेरणा घेऊन आयुष्यात मोठे व्हावे.ज्या क्षेत्रात ज्याल त्याठिकाणी उत्कृष्ट काम करून आपल्या गावच नाव उज्ज्वल करा असं आवाहन श्री नावळे यांनी विद्यार्थ्यांना केले.स्पोर्टस गृपच्यावतीने विद्यार्थाना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.