विद्यार्थ्यांनो काळाची पावलं ओळखा, ध्येयवादी बना

सुनिल मोरेंचा मोलाचा सल्ला
Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 11:47 AM
views 80  views

सावंतवाडी : स्पर्धेच्या काळात टिकण्यासाठी विविध विषयांचे ज्ञान मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. आपण ग्रंथालयात, वाचन कक्षामध्ये सातत्यपूर्ण जायला हवे. विविध महापुरुषांची चरित्र वाचायला हवीत.सामान्य कुटुंबातून माणसे जेव्हा असामान्य होतात तेव्हा ती कशा पद्धतीने असामान्य पदाकडे वाटचाल करतात हे समजून घ्यायला हवे. गुरु आणि शिष्य हे नातं अधिक समृद्ध बनायला हवे. विद्यार्थ्यांनी काळाची पावले ओळखून प्राथमिक शाळेत शिक्षण दशेत ध्येयवादी बनायला हवे असे आवाहन गोवा येथील सेवेक्स टेक्नॉलॉजी प्राव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक सुनिल मोरे यांनी केले.


कोकण कला व शिक्षण विकास संस्था आयोजित जिल्हा परिषद पुर्ण प्रार्थमिक शाळा विलवडे नं. १ व २, राजा शिवाजी कविद्यालय, विलवडे या तीनही शाळेतील गरजू व होतकरू, अभ्यासू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थांनी व पालकांनी सुनिल मोरे याच्याशी सवांद साधला. विलवडे शाळेतील विद्यार्थांना कोकण संस्थेकडुन यावर्षी ३४ विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य पुरवून सामाजीक बांधिलकी जोपासली आहे. त्याबरोबर विलवडे व इतर गावातील पुरग्रस्ताना ५० हून अधिक कुटुंबियांना धान्य व जीवनाश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.व्यासपिठावर सरपंच प्रकाश दळवी, ग्रामपंचायत सदस्या अपर्णा दळवी, सानिका दळवी, विनोद पुरोहित, संस्था प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत,संस्था समन्वय हनुमंत गवस, स्कुल कमिटी अध्यक्ष सोनु दळवी, प्रफुल्ल सावंत, रश्मी सावंत, संतोष सावंत,मुख्याध्यापक सुप्रिया सावंत, सरेश काळे, परेश धर्णे, सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये जसे कि विलवडे, बांदा, वाफोली, असनिये, निगुडे, आरोस, साळगाव, माणगाव आणि इतर शाळेतील एकूण १६२ गरजू विद्यार्थांना शेक्षणिक साहित्य वाटप केल्याचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी सांगितले. संस्थेचे या मदतीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व पालकांकडून आभार मानण्यात आले. प्रास्ताविक प्रथमेश सावंत, सुत्रसंचालन शिक्षक मनोहर गवस, वनसिंग पाडवी आभार सुरेश काळे यांनी केले.