
कणकवली : बालदिनानिमित्त बालादिनानिमित्त श्री गणेश मॉंटेसरी प्ले स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी कणकवली पोलीस ठाण्याला भेट दिली. भेटीदरम्यान पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांनी त्यांना पोलीस यंत्रणेच्या कामकाजाबाबत माहिती दिली. मोबाईचा अति वापर विद्यार्थ्यांना टाळावा असे आवाहन नलावडे यांनी केले. तत्पूर्वी तांबे भवन ते पोलीस ठाण्यापर्यंत विद्यार्थ्यांनी मूक रॅली काढली.
मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व मानसिक, शारीरिक विकासावर होत आहे. हा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी रॅली काढली. पोलीस निरीक्षक तेजस नलावडे व पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या वापराचे दुष्परिणाम काय होतात याच्यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने गप्पा केल्या. तृप्ती पाटील , श्रीमती सावंत, श्रीमती कोचरेकर व इतर पोलीस सहकारी उपस्थित होते. तेजस नलावडे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केलं. विद्यार्थ्यांनी त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे आभार मानले. या उपक्रमाबद्दल पालकांनी संस्थेचे व शिक्षकांचे कौतुक केले.












