
देवगड : कणकवली येथील “सिंधूरत्न टॅलेंट सर्च“ (STS) मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धात्मक परीक्षेत जामसंडे येथील मुकुंद वासुदेव फाटक प्राथमिक विद्यालयाच्या इयत्ता २ री मधील विद्यार्थी कुमार : वेद नारायण चव्हाण याला गोल्ड मेडल व गौरवपत्र प्राप्त झाले असून याच विद्यालयातील इयत्ता ४ थी मधील कुमार : हिमांशू नारायण चव्हाण याला गोल्ड मेडल व गौरवपत्र प्राप्त झाले आहे.तसेच कुमार : आयुष प्रमोद मुणगेकर याला ब्राँझ मेडल व गौरवपत्र प्राप्त झाले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांनाचेतन पुजारे व सौ. कोमल खाजनवाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष ॲड.अजितराव गोगटे , सचिव - प्रवीण जोग, प्राथमिक विभागाचे अध्यक्ष - ॲड. अभिषेक अजीत गोगटे , शाला समिती अध्यक्ष - प्रसाद मोंडकर व मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.