
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा मेकॅट्रॉनिक्स विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी माजगाव येथील कशाळीकर ऑटोकेअर या आस्थापनाला भेट दिली. इंडस्ट्रीअल व्हिजिट या उपक्रमाअंतर्गत ही भेट देण्यात आली. यावेळी वाहनांमध्ये वापरली जाणारी ऑनबोर्ड डायग्नोस्टिक सिस्टम, वाहनाची रचना आणि एअरबॅग सिस्टमची पाहणी करण्यात आली. कशाळीकर ऑटोकेअरचे संचालक आबा कशाळीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.सचिन लांजेकर उपस्थित होते.