कळणेत संगीत परीक्षेत आयडीयल स्कूल ऑफ म्युझिकच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

संस्थाध्यक्ष एम.डी. देसाईंच्या पुढाकाराने नूतन विद्यालयाचा अभिनव उपक्रम
Edited by: संदीप देसाई
Published on: August 03, 2023 19:09 PM
views 159  views

दोडामार्ग :  नूतन विद्यालय कळणे प्रशालेने सुरु केलेल्या आयडीयल स्कूल ऑफ म्युझिकच्या ७ विद्यार्थांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या संगीत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल आहे.    सुप्रसिध्द सिने गायक स्वप्नील बांदोडकर संचलित संक्रम आणि कळणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कळणे संचलित नूतन विद्यालय व प्रा. एम .डी. देसाई कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय कळणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयडीयल स्कूल ऑफ म्युझिक संगीत कोर्स गेल्या वर्षापासून कळणे येथे सुरु करण्यात आले आहेत.


       दरवर्षी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयामार्फत संगीत परीक्षा घेण्यात येतात. सन २०२२-२३ मध्ये झालेल्या परीक्षेत कळणेचे एकूण ७ विद्यार्थी संगीत परीक्षेला बसले होते. सातही विद्यार्थी परीक्षेला उत्तीर्ण झाले. यामध्ये आर्या बापू सावंत , सोहम संतोष सावंत , सुरज ज्ञानेश्वर नाईक, वेदांत धर्मराज कळणेकर  तन्मय बापू सावंत, आदेश खानोलकर, मानवी गणेश धुरी यांनी संगीत परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थाचे संस्थापक प्रा,मोहनराव देसाई तसेच मुख्याध्यापक महेंद्र देसाई यांनी केले.                        

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव‘’आयडीयल स्कूल ऑफ म्युझिक‘

कळणे पंचक्रोशी शि. प्र. मंडळाचे संस्थापक प्रा. मोहनराव देसाई यांनी संगीत विद्यालयाचा स्वतंत्र कोर्स सुरु करून पंचक्रोशीतील विद्यार्थांना संगीत शिक्षणाची सुवर्णसंधी नूतन विद्यालयामार्फत उपलब्ध करून दिली. शिक्षणाबरोबर संगीताचे धडे विद्यार्थांना मिळाले पाहिजे याकरिता आयडीयल स्कूल ऑफ म्युझिक हा संगीत वर्ग सुरु केलाय. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव संगीत स्कूल असल्याचा दावा त्यांनी केलाय.

संगीत परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थांना दहावीत १२ गुण 

   नूतन विद्यालय कळणे प्रशाला विद्यार्थ्यांसाठी  नवनवीन उपक्रम राबविते. त्याच अनुषंगाने दहावीत संगीत शिक्षण आणि त्यामूळे खास १२ गुण मिळतात. यासाठी आयडियल स्कूल ऑफ म्युझिक संगीत वर्ग सन २०२२ मध्ये सुरु केला असून संगीताची आवड असणाऱ्या विद्यार्थांनी संगीत कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे. संगीत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थाला इ.१० वी मध्ये १२ गुण मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्याच्या गुणात २ टक्केनी वाढ होते. यामुळे संगीत विद्यालयात विद्यार्थाच्या प्रवेशात वाढ होत आहे.


संगीत क्षेत्रातील अलंकार पदवीधारक प्रशिक्षक 

सुप्रसिध्द गायक स्वप्नील बांदोडकर संचलित संक्रम यांच्याशी सलग्न आडीयल स्कूल ऑफ म्युझिक हा संगीत वर्ग आहे. या संगीत वर्गाचे प्रशिक्षण नूतन विद्यालयाचे सहा. शिक्षक तथा संगीत क्षेत्रातील अलंकार पदवीधारक  प्रसाद गोसावी देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अलंकार पदवीधारक क्वचितच आहेत. त्यातील गोसावी हे एक आहेत.