देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा क्रीडा क्षेत्रातही ठसा..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 29, 2023 19:42 PM
views 189  views

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक, सामजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेल्या देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या क्रीडा क्षेत्रातही आपल्या यशस्वी कामगिरीची मोहर उमठवली आहे. 

मुंबई विद्यापीठ आयोजित कोंकण विभाग स्तरावरील क्रीडा स्पर्धा नुकत्याच डेरवण येथील क्रीडांगणावर संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील १७ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये आपला यशस्वी सहभाग नोंदविला. कु. धनराज मंगेश घाडी (TY BSc.IT)याने तिहेरी उडी या क्रीडा प्रकारात आणि कु. युवराज नाना जोई्ल ( M.Com.II) याने गोळाफेक मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करीत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

नोव्हेंबर मध्ये मुंबई विद्यापीठात होणाऱ्या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे तसेच महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कौतुक केले आहे. तसेच शिक्षण विकास मंडळ, देवगडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील सर्वांचे अभिनंदन केले आहे.