गौरव क्रांतीदिनाच्या औचित्याने सावंतवाडीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव !

Edited by: विनायक गावस
Published on: August 08, 2023 15:55 PM
views 128  views

सावंतवाडी : नामदार दीपक भाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे. फेब्रुवारी, मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १० वी व १२ वी परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या प्रत्येक शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा व शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना मराठी विषयात ९८ व ९९ गुण प्राप्त झालेत त्याही विद्यार्थ्यांचा गौरव क्रांतीदिनाचे औचित्य साधून बुधवार ९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथे काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.


विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या शाळांचे निकाल २०२३ मध्ये १००% लागले आहेत त्या मुख्याध्यापकांचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरव केला जाईल. तसेच सामाजिक, शैक्षणिक, कृषी या क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा सन्मान शाल, श्रीफळ देऊन केला जाणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन  नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाकडून करण्यात आल आहे.