राकेश परब यांना विद्धार्थी मित्र पुरस्कार प्रदान !

Edited by: विनायक गावस
Published on: October 05, 2023 18:30 PM
views 131  views

सावंतवाडी : नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग या संस्थेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेली २३ वर्षे देत असलेल्या योगदान बद्दल बांद्याच्या व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूल बांदा मधील मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स या अभ्यासक्रमाचे तंत्रशिक्षक श्री. राकेश परब यांना 'विदयार्थी मित्र' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.

नुकताच  कुडाळ येथील मराठा समाज हॉल मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात राकेश परब यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सहदेव धर्णे, अमित केरवडेकर,जोवेल डिसिल्वा, बापू परब, संजय पिळणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी राकेश परब यांना पर्यावरण मित्र पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. शैक्षणिक, सामाजिक कार्यात त्यांनी नेहमीच योगदान दिले आहे.