
सावंतवाडी : आरोंदा येथील महिला रेणुका रामचंद्र नाईक ह्याना तोंडाचा कॅन्सर झाला आहे. त्यांचे ऑपरेशन झाले आहे. टाटा हाॅस्पीटलमध्ये गेले तीन चार महिने त्यांच्यावर उपचार चालू आहेत. तिची मुलगी मनिषा रामचंद्र नाईक ही हुमरमळा येथील पुप्षसेन सावंत यांच्या डी.फार्मसी काॅलेज मध्ये शिकत आहे. तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून सुमारे पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदत विशाल सेवा फाउंडेशनच्या वतीने मदत करण्यात आली. विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष, भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांनी ही रक्कम बांदाचे माजी सरपंच अक्रम खान यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी अक्रम खान, अमितेश नाईक आदी उपस्थित होथे. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान यांनी विशाल परब यांना धन्यवाद दिले आहेत.