
सावंतवाडी : विश्व हिंदू परिषद बजरंगदल सावंतवाडी, शिवप्रेमी व गोरक्षक सिंधुदुर्गच्या वतीनं शिवजन्मोत्सवाच आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आलं आहे. या निमित्ताने सायंकाळी कोकण कॉलनी ते गांधी चौक अशी भव्य मोटर सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर गांधी चौक येथे बजरंगदल क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी, हिंदुत्ववादी नेते, पालकमंत्री नितेश राणे, प्रखर हिंदुत्ववादी विक्रम पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी आपली मनोगत व्यक्त करणार आहेत. यानंतर रात्री पारंपरिक नृत्य स्पर्धा होणार आहे. मोटारसायकल रॅली मध्ये आकर्षक वेशभूषा करणाऱ्याला विशेष पारितोषिक देण्यात येणार असून या प्रसंगी उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.