
मालवण : मालवण बस स्थानकासमोरील लॅबमध्ये काम करणाऱ्या एका महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली आहे. या महिलेने अलीकडे दुसरे लग्न केले आहे. या रागातून तिच्या पहिल्या नवऱ्याने हे कृत्य केल्याचे समजते.
बस स्थानक परिसरातील नागरिकांनी या महिलेच्या अंगावरील आग विझवून तिला उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मालवण पोलिसांनी रुग्णालयात येऊन माहिती घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत. भर वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.