शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पवार - राष्ट्रवादीचे हात बळकट करा : अर्चना घारे-परब

Edited by: दिपेश परब
Published on: June 21, 2023 16:58 PM
views 127  views

 वेंगुर्ले : राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून कष्टकरी महिलांच्या प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष जागरूकता दाखवून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईवर नियंत्रण येण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार हेच मार्ग काढू शकतात. त्यासाठी राष्ट्रवादी पक्ष मजबुत करा. असे प्रतिपादन कोकण विभागीय महिला अध्यक्षा तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी वेंगुर्ले येथील राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.

   वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुका राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित केलेला कष्टकरी महिला व पुरुष यांना त्यांच्या दररोज मालविक्रीच्या व्यवसायांत कडक उन्हात तसेच पावसांत आपला व्यवसाय करीत असताना होणारा त्रास लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मोठ्या छत्र्या वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित पदाधिकारी प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल, तालुकाध्यक्ष योगेश कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्ला सदस्य नितीन कुबल, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका प्रज्ञा परब, डॉक्टरसेलच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉ सई लिंगवत, जिल्हा डॉक्टरसेलने अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, महिला तालुकाध्यक्षा दिपिका राणे, शहर महिला अध्यक्ष अपूर्वा परब यांच्या हस्ते या मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यांत आले. यावेळी राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, तालुका अध्यक्ष योगेश कुबल, राष्ट्रवादी डॉक्टर सेल अध्यक्ष संजीव लिंगवत यांनी मार्गदर्शन केले.

   यावेळी राष्ट्रवादी डॉक्टर सेल जिल्हा महिला संघटकपदी डॉ. सई लिंगवत, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या वेंगुर्ले तालका अध्यक्षपदी फैजान शेख, आडेली विभागीय अध्यक्षपदी वैभव वाडकर,  कामळेवीर बुथप्रमुख उमेश आळवे, वजराठ बुथप्रमुख सचिन सावंत, अनिकेत वेंगुर्लकर, विशाल परब, दाभोलीचे बुथ अध्यक्ष लाडोबा सारंग यांना पक्षाची नियुक्ती पत्रे देण्यात आली तसेच डॉ. सई लिंगवत यांचा सर्वसामान्य जनतेशी व महिलांशी असलेला संपर्क व त्यांचे वैद्यकिय सहकार्याचे काम उत्कृष्ठ असल्याबद्दल अर्चना घारे-परब यांचे हस्ते शाल व श्रीफळ देवून तर जेष्ठ सदस्य बबन पडवळ यांचा सत्कार करण्यांत आला. यावेळी अन्य उपस्थित मान्यवरांत माजी तालुकाध्यक्ष बावतीस डिसोजा, शहर सचिव स्वप्नील रावळ, बबन पडवळ यांचासमावेश होता.