
सिंधुदुर्गनगरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमांतर्गत समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग व बार्टी यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसाल, सिंधुदुर्गनगरी येथे समतादूतांमार्फत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी समाज कल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे, विशेष अधिकारी तुषार गवळी, समाज कल्याण निरीक्षक प्रताप कांबळे, कनिष्ठ लिपिक महेंद्र मेन, संतोष परुळेकर, प्रकल्प अधिकारी विजय कदम, समतादूत सगुण जाधव, संग्राम कासले, सुजित जाधव, राजू दीनदयाळ, सुहास मोचेमाडकर आदी उपस्थित होते. पथनाट्य सादरीकरणात समता दूत सगुण जाधव यांनी संत गाडगेबाबांची व्यक्तिरेखा साकारून संत गाडगेबाबांचे विचार उपस्थितापर्यंत पोहोचवले.










