वनवणवा रोखा...जंगल वाचवा

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 06, 2024 13:41 PM
views 93  views

कणकवली : महाराष्ट्र शासन वन विभाग सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र कणकवली यांच्यावतीने वनवणवा प्रतिबंध सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये आज कणकवली कनेडी येथे वनवणवा रोखा.. जंगल वाचवा..ची जनजागृती फेरी केनेडी भिरवंडे येथे काढण्यात आली.

झाडे वाचवा जंगल वाचवा हि जनजागृती करण्यासाठी वनक्षेत्रपाल कणकवली यांच्या वतीने सध्या १ फेब्रुवारी ७ फेब्रुवारी पर्यंत वनवणवा रोखा.. जंगल वाचवा... सप्ताहाच्या वतीने केनेडी हायस्कुल व ग्रामस्थांच्या सहकार्यने जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये झाडे वाचवा जीवन वाचवा जंगलतोड करू नका अशा विविध प्रकारच्या घोषणा मुलांनी दिल्या. ही फेरी केनेडी हायस्कूल ते गांधीनगर ग्रामपंचायत मार्गे भिरवंडे ग्रामपंचायत  ते रामेश्वर मंदिर परिसरात या फेरीची सांगता करण्यात आली. यावेळी कणकवली वनक्षेत्रपाल रा. द.घुनकिकर , भिरवंडे सरपंच नितीन सावंत , कानेडी हायस्कूल पर्यवेक्षक बयाजी बुरान, भिरवंडे पोलीस पाटील, बाळकृष्ण सावंत, वनपाल भिरवंडे, कु. बा. कांबळे, वनपाल दिगवले स. दी. पाटील, वनरक्षक भिरवंडे, सु. कू. गळवे, वनरक्षक नाटळ पूजा चव्हाण, वनरक्षक दिगवले, प्र. रां. शिंदे, वनसेवक गुडेकर, तांबे, गावकर, सुद्रिक, रासम उपस्थित होते.