
वैभववाडी : वैभववाडीत भर दिवसा चोरट्यांनी आज (ता. २६) आठवडाबाजारादिवशी एका वृध्दाची २० हजार रूपयांची रोकड बॅगेतून लंपास केली. ही घटना एका बेकरी समोर घडली आहे. तसेच आणखी एका महीलेची पिशवी याच चोरट्यांनी लंपास केली आहे. मात्र, त्यात खाऊ होत.या दोन्ही सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. यात दोन संशयित चोरट्यांची छबी देखील कैद झाली आहे. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.