
सावंतवाडी : कुठल्याही छोट्या मोठ्या घटनेवर तात्काळ ट्विट करणाऱ्या पंतप्रधानांनी अखेर ४ दिवसांनंतर शिवछत्रपतींच्या शिल्प पडल्याची जाहीर माफी मागितली. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत उभारण्यात आलेला पुतळा, तो आठ महिन्यांत पडला त्याबद्दल मागितलेली माफी देखील निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच मागण्यात आली आहे असा टोला उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी हाणला आहे.
ते म्हणाले, माफी मागण्याची जागा चुकली. पंतप्रधान काल महाराष्ट्रात आले होते. मग खरंतर जिथे न भूतो न भविष्यती अशी दुर्घटना घडली तिथेच राजकोट मालवण येथे येऊन पंतप्रधानांनी महाराजांची आणि जनतेची माफी मागितली असती तर ते योग्य ठरले असते असं मत डॉ जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केल.