
सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची जबाबदारी नौदलाकडे होती तर या पुतळ्यासाठी राज्य शासनाने ६ कोटी रुपये खर्च का केले ? हा निधी का दिला ? असा सवाल मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी केला. तर हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे असा आरोप त्यांनी केला.
याप्रकरणी माहितीच्या अधिकारात कागदपत्रे घेऊन जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. कलासंचालनाने अधिकृत मान्यता दिलेली नाही. पुतळा उभारताना रितसर परवानगी घेतली नाही. शिल्पकार जयदीप आपटे व स्ट्रक्चरर चेतन पाटील यांना दोन फुटांच्यावर पुतळा बनवण्याचा कोणताही अनुभव नसताना काम दिलं गेलं. पुतळा पडणे ही घटना काळीमा फासणारी आहे असं मत अँड. सावंत यांनी व्यक्त केले. यावेळी अभिषेक सावंत, पुंडलिक दळवी, मनोज घाटकर, संजय लाड, प्रसाद राऊळ, आनंद गवस, नंदू विचारे, शिवा गावडे, श्रीपाद सावंत, राजे प्रतिष्ठानचे खजिनदार ज्ञानेश्वर पारधी आदी उपस्थित होते.